शहरातील विविध विकास कामांसाठी एक कोटी तर क्रीडांगणासाठी पाच कोटी रुपये..
*💫कणकवली दि.०७-:* कणकवली शहरात भूमिगत वीज वाहिन्या संदर्भात खासदार विनायक राऊत यांच्या पाठपुराव्यामुळे सहा कोटी निधी प्राप्त झाला होता मात्र रस्ता दुरुस्तीसाठी सत्ताधाऱ्यांनी अव्वाच्या सव्वा दर दिल्यामुळे तो निधी परत गेला आहे. तसेच क्रीडांगण विकासासाठी पाच कोटी तर अद्यावत अग्निशामक बंब देण्याबाबत पालकमंत्री उदय सामंत यांनी मान्य केले आहे जिल्हा नियोजन मधून शहरातील विविध विकास कामांसाठी एक कोटी रुपये देण्यात आले आहे.आता भालचंद महाराज आश्रम मंडपाचे कामासाठी ५० लाख व तेथील भूमिगत वीजवाहिन्यासाठी ७ निधी देण्यात आला आहे.कणकवली श्रीधर नाईक उद्यानासाठी पुनर्विकासासाठी ७५ लाखाचा निधी जिल्हा नियोजन मधून शिवसेनेच्या माध्यमातून देण्यात आल्याची माहिती शिवसेना नेते संदेश पारकर यांनी दिली. कणकवली येथील विजय भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते यावेळी शिवसेना आमदार वैभव नाईक, महिला आघाडीप्रमुख नीलम पालव- सावंत,नगरसेवक सुशांत नाईक, भूषण परुळेकर, शिवसेना उपजिल्हाप्रमुख सुजित जाधव आदी शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते. सिंधुदुर्ग जिल्हा नियोजनचा १७० कोटी आराखडा मंजूर झाला.श्रीधर नाईक उद्यान पुनर्विकासासाठी नगरसेवक सुशांत नाईक रुपेश नार्वेकर कन्हैया पारकर आणि मी ७५ लाखाची मागणी केली होती.तो निधी पालकमंत्री यांनी दिला.१ कोटी अन्य कामासाठी कणकवलीत आगीच्या घटना घडल्या आहेत.दोन महिन्यांत अद्ययावत बंब देण्यात येणार आहे.शहरात अनेक काम झाली आहेत. शिवसेनेचे सर्वांगीण विकासाची जबाबदारी आहे.पालकमंत्री खासदार व आमचे आमदार चांगले काम आणि कार्य करत आहेत.कणकवलीत सत्ता नसली तरी आम्ही काम करत आहोत.शिवसेना व विकास आघाडी सरकारच्या माध्यमातून केला जात आहे,असे संदेश पारकर यांनी सांगितले. कणकवली भालचंद्र महाराज आश्रमाजवळ असलेल्या प्राथमिक शाळा बाबत ना. एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आहे. भालचंद्र महाराज मंदिर शाळा क्र.३ जागा आश्रमाला द्यावी. आश्रम चालक दुसरी शाळा उभी करुन देतील .याबद्दल मंत्र्यांच्या दालनात पुन्हा बैठक लावण्यात येणार आहे. भालचंद्र महाराज लाखो भाविक येतात.त्यानिमित्ताने त्यांची सुविधा व्हावी,अशी अपेक्षा आहे, असे संदेश पारकर यांनी सांगितले.
