आंबोलीला जाताना तीन-तीन पोलीस चौकी असताना मृत्यूदेह कसे काय सापडतात…?

बबन साळगावकर यांचा सवाल: त्या पोलीस चौकी मलिदा खाण्यासाठीच आहेत का…?

आंबोली ता.०२-:

आंबोली बदनाम होत चालली आहे आंबोलीच्या व्यवसाय संपत चालला आहे पर्यटना वरती याचा मोठा प्रमाणात परिणाम होत आहे गोव्यातून एका महिलेचा प्रेत आंबोली घाटात टाकला जाता सिंधुदुर्ग पोलीस करतात काय असा प्रश्न निर्माण होत असून गोळ्यातून सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये येताना तीन पोलीस चौकी असताना अशा प्रकारचे घटना कसे काय घडतात असा सवाल माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी उपस्थित केलाय

दरम्यान आंबोली आजरा आंबोली बेळगाव तिथे वरती चेक पोस्ट बसवण्याची मागणी केली होती काही दिवस हा चेक पोस्ट सुरू होता आता बंद आहे पर्यटनाच्या मोठमोठ्या वाल्गना केल्या जातात परंतु आंबोली पर्यटन वाढीसाठी विशेष प्रयत्न तगायत झालेले नाहीत तसेच हे चेक पोस्ट काय मलिदा खाण्यासाठीच आहेत काय याचे उत्तर द्यावं तसेच अधीक्षकांनी याची चौकशी करावी अशी मागणी देखील माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी करावी.

You cannot copy content of this page