⚡मालवण ता.०१-:
भाजपचे माजी नगरसेवक परशुराम उर्फ आप्पा लुडबे यांच्या पुढाकारातून वायरी येथे श्री. लुडबे यांच्या निवासस्थानी उद्या शनिवार दि. २ सप्टेंबर रोजी सकाळी ९ ते ५ यावेळेत आधार कार्ड नोंदणी आणि दुरुस्ती शिबीर आयोजित करण्यात आले आहे.
या शिबिरात नवीन आधारकार्ड नोंदणी, ५ वर्षांनंतर, १५ वर्षांनंतरचे लहान मुलांची अपडेट, आधारचा फोटो बदलणे, नाव, पत्ता, जन्मतारीख, मोबाईल नंबर बदल, नाव दुरुस्ती करणे, हातांचे ठसे अद्यावत करून दिल्या जाणार आहेत. या शिबिरात प्रथम नावनोंदणी करणाऱ्या ५० जणांनाच लाभ मिळणार आहे. तरी अधिक माहिती आणि नावनोंदणीसाठी आप्पा लुडबे ९४२२५८४७८८ यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे
