बांद्यात उपसरपंचांनी रस्त्यावर उतरत केली वाहतूक सुरळीत…

बांदा ता.०१-:
बांदा शहरात कट्टा कॉर्नर चौकात झालेली प्रचंड वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी उपसरपंच जावेद खतीब यांनाच रस्त्यावर उतरावे लागले. त्यांनी रस्त्यावर उतरत १५ मिनिटात वाहतूक कोंडी सुरळीत केली.

बांदा शहरात नेहमीच वाहतूक कोंडी होते. कट्टा कॉर्नर येथे वाहतूक कोंडीचा सर्वाधिक फटका बसतो. आज दुपारी याठिकाणी प्रचंड वाहतूक कोंडी झाली. वाहतूक पोलीस नसल्याने खुद्द उपसरपंच खतीब यांनाच रस्त्यावर उतरावे लागले. त्यांनी १५ मिनिटात वाहतूक सुरळीत केली. यावेळी त्यांच्यासोबत ग्रामपंचायत सदस्य शामसुंदर मांजरेकर उपस्थित होते.

You cannot copy content of this page