सब ज्युनिअर नॅशनल चॅम्पियनशिपसाठी महाराष्ट्राच्या फुटबॉल संघात आर्यक जाधवची निवड

⚡कणकवली ता.०१-:
चेतन फुटबॉल क्लबचा खेळाडू आणि के. ए. बांठिया स्कूल न्यू पनवेल इंग्रजी माध्यमाचा विद्यार्थी आर्यक (प्रिन्स ) नरेंद्रकुमार जाधव याची 3 ते 13 सप्टेंबर 2023 या कालावधीत वेस्ट बंगाल येथे होणाऱ्या 14 वर्षांखालील सब ज्युनिअर नॅशनल चॅम्पियनशिप 2023-24 साठी महाराष्ट्राच्या फुटबॉल संघात अंतिम 11 जणांमध्ये निवड झालेली आहे.


आर्यक हा मूळ कणकवली तालुक्यातील कलमठ सिद्धार्थ काॅलनी येथील रहिवाशी असून बालपणापासून तो पनवेल के. ए. बांठिया इंग्लिश स्कूल मध्ये शिक्षण घेत आहे.आर्यक याला फूटबॉल खेळाची आवड आहे.आर्यक हा फुटबॉल बरोबरच रायगड जिल्ह्यातून 14 वर्षाखालील लेदरबाॅल क्रिकेट टीम मधून खेळतो.त्याला मुख्य प्रशिक्षक -चेतन दिपक जगनाडे आणि सहाय्यक प्रशिक्षक सिमरन मेहता व इतर प्रशिक्षकांचे मार्गदर्शन लाभले.
आर्यकचे वडील नरेंद्रकुमार जाधव हे तळोजा पनवेल येथे केमिकल कंपनीत सुपरवायझर असून,आई निकिता जाधव खासगी शाळेत शिक्षिका आहे.तसेच निवृत्त तालूका मास्तर के.स.जाधव यांचा आर्यक हा नातू आहे.

You cannot copy content of this page