आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते उद्घाटन :स्पर्धकांचा उस्फुर्त प्रतिसाद
⚡मालवण ता.३०-:
मालवणच्या प्रसिद्ध नारळी पौर्णिमा उत्सवनिमित्त सौ. शिल्पा यतीन खोत मित्रमंडळातर्फे दरवर्षीप्रमाणे यावर्षीही आयोजित करण्यात आलेल्या महिलांच्या नारळ लढविणे या स्पर्धेला महिला स्पर्धकांचा उस्फुर्त प्रतिसाद लाभला यावेळी स्वराज्य ढोल पथकाच्या सुरेल ढोलवादनाला कोंबडा आणि हनुमान यांच्या वेशभूषेची लाभलेली साथ त्यामुळे ही स्पर्धा रंगतदार झाली.
नारळी पौर्णिमा उत्सवनिमित्त सौ. शिल्पा यतीन खोत मित्रमंडळातर्फे दरवर्षीप्रमाणे यावर्षीही नारळ लढविणे स्पर्धा नवीन बंदर जेटीवर आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेचे उदघाटन आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी शिवसेना ठाकरे गटाचे नेते संदेश पारकर, भाई गोवेकर, हरी खोबरेकर, बाबी जोगी, मंदार केणी, सौ. शिल्पा खोत, यतीन खोत, महेश जावकर, मंदार ओरसकर, दीपा शिंदे, आदी व इतर उपस्थित होते. यावेळी आम वैभव नाईक यांनी सौ शिल्पा खोत तसेच यतीन खोत यांच्या सामाजिक कार्याचे गौरव करून शुभेच्छा दिल्या

या स्पर्धेत मोठ्या संख्येने महिला व तरुणींनी उत्स्फूर्त सहभाग घेत नारळ लढविण्याचा आनंद लुटला. यावेळी मालवणवासीयांनी एकच गर्दी केली होती
