⚡मालवण ता.३०-: नारळी पौर्णिमा उत्सवा निमित्ताने मालवणी संस्कृती व वारसा मंडळातर्फे मालवण बंदर जेटी येथे महिलांसाठी नारळ लढवणे स्पर्धेत
प्रथम क्रमांक पटकाविणाऱ्या लीना ओश्रामकर यांना पैठणी, सोन्याची नथ तसेच सोबत १० लाखाचा विमा प्रदान करण्यात आला
नारळी पौर्णिमा उत्सवा निमित्ताने मालवणी संस्कृती व वारसा मंडळातर्फे मालवण बंदर जेटी येथे महिलांसाठी नारळ लढवणे स्पर्धा आयोजित केली होती. यंदा या स्पर्धेचे आठवे वर्षं होते. या स्पर्धेचे उदघाटन माजी खासदार निलेश राणे यांच्या हस्ते करण्यात आले. या स्पर्धेला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या स्पर्धेला आमदार वैभव नाईक, कोकण सिंचन पाटबंधारे माजी उपाध्यक्ष साईनाथ चव्हाण, संदेश पारकर, दत्ता सामंत, मंडळाचे अध्यक्ष अरविंद मोंडकर, साक्षी वंजारी, सुदेश आचरेकर, बाबा मोंडकर, हरी खोबरेकर, दीपक पाटकर, बाबा परब, उमेश नेरुरकर, महेश कांदळगावकर, ऍड, अमृता मोंडकर, गणेश पाडगावकर, देवानंद लुडबे, योगेश्वर कुर्ले, स्नेहल मेथर, संदेश कोयंडे, जेम्स फर्नांडिस, पल्लवी तारी खानोलकर, दीपा शिंदे, पूजा करलकर, शुभदा पाडगावकर, ममता तळगावकर, हर्षदा पाटील,लक्ष्मीकांत परुळेकर, मोहन वराडकर, महेश जवकर, सौरभ ताम्हणकर, राजा गावकर, बबन शिंदे, प्रीतम गावडे, केदार केळुस्कर,हरी चव्हाण, ललित चव्हाण महेश सारंग आदि मान्यवर उपस्थित होते.
सन २०१६ पासून या स्पर्धेच आयोजन आम्ही करत आहोत,
कोरोनाच्या कालावधी मध्ये देखील मंडळाच्या वतीने सतत दोन वर्षे सातत्याने या सणाचं वैशिष्ट्य जपत बंदर जेठी जवळ मास्क वाटप केलं.
या स्पर्धेचा उर्वरित निकाल पुढीलप्रमाणे
द्वितीय क्रमांक – तनिष्का आचरेकर –
पैठणी व सोन्याची नथ
सोबत १० लाखाचा विमा
तृतीय क्रमांक अनिता मयेकर यांस पैठणी व चांदीची पैंजण
चतुर्थ क्रमांक इश्वरी जोशी हिस
पैठणी, मोबाईल
स्पर्धेत सहभाग, पाहण्यासाठी आलेल्या महिला भगिनींना सामाजिक संदेश असलेली कुपन देण्यात आली यामधून सिद्धि आत्माराम ढोलम यांस चांदीचा छल्ला लकी ड्रॉ द्वारे देण्यात आला स्पर्धेसाठी नारळ मोफत देण्यात आले सूत्रसंचालन अध्यक्ष अरविंद मोंडकर यांनी केले
..
