उबाठा शिवसेनेकडून कुडाळमध्ये
नारळी पौर्णिमा साजरी

⚡कुडाळ ता.३०-: नारळी पौर्णिमा सणाचे औचित्य साधून उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आज कुडाळ शहरात रिक्षा मिरवणूक रॅली काढण्यात आली.शिवसेना कार्यालयाकडून या रॅलीचा शुभारंभ उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख संजय पडते यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आला. यावेळी शिवसेना कार्यकर्त्यानी घोषणा दिल्या.


शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने दरवर्षी नारळी पौर्णिमेनिमित्त शहरात रिक्षा मिरवणूक काढून भंगसाळ नदीत नारळ अर्पण केला जातो. यावर्षी या रॅलीचा शुभारंभ उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख संजय पडते यांच्या हस्ते झाला.
यावेळी माजी उपगराध्यक्ष मंदार शिरसाट, नगरसेवक किरण शिंदे, नगरसेवक उदय मांजरेकर, रुपेश पावसकर, तालुकाप्रमुख राजन नाईक, अतुल बंगे, माजी जिल्हा परिषद सदस्य अमरसेन सावंत, गंगाराम सडवेलकर, बबन बोभाटे, नगरसेविका श्रुती वर्दम, नगरसेविका श्रेया गवंडे, आदी पदाधिकारी कार्यकर्ते रॅलीत सहभागी झाले होते.

You cannot copy content of this page