⚡कुडाळ ता.३०-: ग्रामपंचायत वेताळ बांबर्डे आयोजित खास महिलांसाठी “श्रावणमेळा २०२३”चे आयोजन येत्या शनिवार, २ सप्टेंबर २०२३ रोजी करण्यात आले आहे. हा कार्यक्रम मांगल्य मंगल कार्यालय, वेताळ बांबर्डे येथे सकाळी ठीक १० वाजता आयोजित केला आहे. यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा उप मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक ठाकुर, कुडाळ पंचायत समितीचे गटविकास अधिकारी विजय चव्हाण आणि कुडाळच्या पोलिस निरीक्षक रुणाल मुल्ला यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.
या श्रावणमेळ्यात रानभाज्या आणि पाककला, उखाणा स्पर्धा, खेळ पैठणीचा, पारंपरिक फुगडी यांचे विशेष आकर्षण असेल. मुख्य म्हणजे या श्रावणमेळ्याचे निवेदन प्रख्यात मालवणी निवेदक बादल चौधरी करणार आहेत. या श्रावणमेळ्यासाठी अधिकाधिक नागरिकांनी उपस्थिती दर्शवावी, असे आवाहन ग्रामपंचायत वेताळ बांबर्डे यांच्याकडून करण्यात आले आहे.
