राजन तेलींची केंद्र व राज्यातील उद्योग मंत्र्यांबाबत नाराजी…

जिल्हा काँग्रेसचा आरोप: कुठलेही उद्योगधंदे जिल्ह्यात येऊ शकले नसल्याने तेलींची खंत..

⚡सावंतवाडी ता.२९-: केंद्र व राज्यातील सरकार जिल्ह्यात उद्योगधंदे आणण्यास अपयशी ठरल्यानेच भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष आडाळी एमआयडीसी बाबत बोलत आहेत ,त्यांनची केंद्र व राज्यातील उद्योग मंत्र्यांच्या कामकाजा बाबत नाराजी आहे हे त्यांच्या बोलण्यातून दिसून येते येत आहे, असा आरोप जिल्हा काँग्रेसने आज पत्रकार परिषदेत केला.

दरम्यान आडाळी एमआयडीसी बाबत तेथील कृती समितीने लॉन्ग मार्च काढला होता याला काँग्रेसने पाठिंबा देऊन सहभाग दर्शवला तर जिल्ह्यात उषाइस्पातनंतर कुठलाही मोठा उद्योग धंदा आला नाही हे येथील राज्यकर्त्यांचे अपयश असल्याचा देखील त्यांनी यावेळी सांगितले.

गेले दीड दोन वर्ष केंद्रात व राज्यात यांचेच उद्योग मंत्री आहेत,त्यांच्या या जिल्ह्यात या कुठलेही उद्योगधंदे आणू शकले नाहीत याचीच खंत तेली यांना असावी त्यामुळे ते असे वक्तव्य करत असावे असा टोला देखील त्यांनी यावे लगावला.

यावेळी माजी जिल्हाध्यक्ष विकास सावंत,तालुकाध्यक्ष महेंद्र सांगेलकर,उप तालुकाध्यक्ष समीर वंजारी , शहराध्यक्ष राघवेंद्र नार्वेकर, बाळासाहेब नंदी आळी, बाबल्या म्हापसेकर,माया चिटणीस, सुमेधा सावंत, अमेदी मिस्त्री, सुधीर मल्हार,

You cannot copy content of this page