मच्छीमारांनी सोडविली बोट:वेंगुर्ले बंदर येथील घटना
वेंगुर्ले:
वेंगुर्ला येथील हॉलिक्रॉस रापण मच्छिमार संघाने
शनिवारी दुपारी ३ वाजण्याच्या दरम्याने येथील नवाबाग समूद्रात मासेमारी साठी रापण घालत असताना हवामानात बदल होऊन दक्षिण वारे वाहू लागले. यामुळे समुद्रातून घातलेली जाळी वाहत जात वेंगुर्ला बंदर येथील खडकात अडकली. दरम्यान ही माहिती किनाऱ्यावर असणाऱ्या या रापण मच्छिमारांना समजताच त्यांनी होडी समुद्रात घेऊन जात जाळी खडकातून सोडवण्यासाचा प्रयत्न केला. मात्र त्यांना यश आले नाही. यावेळी येथील स्थानिक सचिन मोर्जे यांनी आपली फायबर बोट आणून ही जाळी सोडवली. मात्र तोपर्यंत सर्व जाळी ठिकठिकाणी फाटून गेली होती. यामुळे रापण मच्छिमारांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. तर रापणीच्या होडीची काही प्रमाणात लाकूड तुटून होडीला सुद्धा छिद्र पडून नुकसान झाले.
दरम्यान शासनाने याचा योग्य तो पंचनामा करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी यावेळी उपस्थित मच्छिमारांनी केली आहे.
यावेळी हॉलिक्रॉस रापण मच्छिमार संघाचे रुजाय फर्नांडिस, गॅब्रियन ब्रिटो, बस्त्याव ब्रिटो , रुजाय ब्रिटो, जुवाव ब्रिटो, शशिकांत मांजरेकर, बाबू मांजरेकर, कामिल फर्नांडिस , इजिदर डीसोजा, सेलेस्टिन फर्नांडिस, फिलिप आल्मेडा, रेनेत ब्रिटो, उल्लास आरोलकर, रवी तुळसकर, प्रसाद मांजरेकर, प्रशांत साळगावकर, प्रवीण डीचोलकर, संतोष कोरगावकर, रॉजर फर्नांडिस, आत्माराम पेडणेकर आदी मच्छिमार उपस्थित होते.
फोटो: वेंगुर्ले नवाबाग येथे रापण मासेमारीची फाटलेली जाळी दाखवताना मच्छिमार
