कुडाळ आगारासाठी १० तर मालवण आगारासाठी ४ नवीन एसटी गाड्या मिळणार…

आ. वैभव नाईक यांनी एसटीच्या महाव्यवस्थापकांकडे केलेल्या पाठपुराव्याला यश..

⚡कुडाळ ता.२५-: कुडाळ आणि मालवण आगारात एसटी गाड्यांची कमतरता असल्याची तक्रार आमदार वैभव नाईक यांच्याकडे एसटी वाहक व कर्मचाऱ्यांनी केली होती. त्यानुसार आमदार वैभव नाईक यांनी एसटी महामंडळाचे महाव्यवस्थापक शेखर चन्ने आणि सिंधुदुर्ग एसटीचे विभाग नियंत्रक अभिजीत पाटील यांच्या समवेत चर्चा करून कुडाळ आणि मालवण आगारासाठी नवीन एसटी गाड्या देण्याची मागणी केली होती.

ही मागणी मान्य करत कुडाळ आगारासाठी ६ स्लीपर व ४ साध्या अशा एकूण १० नवीन एसटी गाड्या आणि मालवण आगारासाठी ४ नवीन एसटी गाड्या देण्याचे शेखर चन्ने यांनी मान्य केले होते. यातील १ स्लीपर गाडी आज कुडाळ आगारात दाखल होणार आहे. अन्य गाड्याही लवकरच दाखल होणार असल्याची माहिती आ. वैभव नाईक यांनी दिली आहे.

You cannot copy content of this page