गोपूरी येथे रक्तदान, नेत्रदान, अवयवदान,देहदान व रुग्णमित्र मार्गदर्शन कार्यशाळा

⚡कणकवली ता.२३-: गोपूरी आश्रम,वागदे कणकवली व सिंधू रक्तमित्र प्रतिष्ठान,सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने कै.गणपतराव सावंत सभागृह, नाईक पेट्रोल पंप मागे, गोपुरी, वागदे, कणकवली येथे रविवार २७ ऑगस्ट रोजी सकाळी १० ते १ या वेळेत रक्तदान, नेत्रदान, अवयवदान,देहदान व रुग्णमित्र या विषयावर मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

या दिवशी ज्यांना मरणोत्तर नेत्रदान, देहदान, अवयवदान करायची इच्छा असेल अशा दात्यांचे फॉर्म भरून घेतले जाणार आहेत.कार्यशाळा पूर्णपणे मोफत असल्याने ज्यांना या विषयाची आवड आहे किंवा हे सामाजिक कार्य करण्याची इच्छा आहे.अश्या जास्तीत जास्त लोकांनी यांचा लाभ घ्यावा. नाव नोंदणी साठी खालील क्रमांक वर आपले नाव, गाव व व्हाट्सअँप मोबाईल नंबर मेसेज करावा.अमेय मडव – 9619326057,अमोल भोगले – 9421235586,अभिषेक नाडकर्णी – 9404936038
तन्वी भट – 8600765458 असे आवाहन करण्यात आले आहे.

You cannot copy content of this page