फाले कुटुंबीयांना टू व्हीलर
असोसिएशनची मदत

⚡कुडाळ ता.२५-:
महादेवाचे केरवडे येथील वीज कर्मचारी धनंजय फाले यांचे कुडाळ येथे काम करीत असताना शॉक लागून निधन झाले.

त्यांच्या कुटुंबियांचा आधारस्तंभ हरपला. यातूनच त्यांच्या कुटुंबीयांना आधार देता यावा, या सामाजिक बांधिलकीतून कुडाळ तालुका टू व्हीलर मेकॅनिकल असोसिएशन यांच्या वतीने त्यांच्या कुटुंबियांना मदतीचा हात देण्यात आला. यासाठी असोसिशनकडून सर्व स्तरावर ३३ हजाराची मदत गोळा करीत फाले यांच्या कुटुंबियांनाकडे मदत सुपूर्द केली. या असोसिशनचे पदाधिकारी आणि सदस्य उपस्थित होते. तसेच आणखी काही मदत लागल्यास असोसिशन आपल्या पाठीशी आहे, अशी हमी देऊन धीर दिला.

You cannot copy content of this page