वैभववाडी प्रतिनिधी
सांगुळवाडी बौद्धवाडी येथील सुधीर मारुती जाधव वय ५५ यांचा मंगळवारी रात्री आकस्मित मृत्यू झाला आहे. याबाबत पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे. त्यांचा मृत्यू हृदय विकाराच्या धक्याने झाल्याचे निदान करण्यात आले आहे. त्यांच्या मृत्यूमुळे सांगूळवाडी गावावर शोककळा पसरली आहे.
सुधीर हे रिक्षा चालक होते. मंगळवारी रात्री 10.15 वाजताच्या सुमारास त्यांना छातीत कळ येऊन तोंडातून फेस येऊन चक्कर येऊन ते पडले होते. त्यांना नातेवाईकांनी तात्काळ वैभववाडी येथील खाजगी दवाखान्यात उपचारासाठी दाखल केले. तेथून अधिक उपचाराकरिता त्यांना ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी घोषित केले.
या घटनेची खबर सचिन धर्माजी जाधव यांनी पोलीस ठाण्यात दिली. त्यानुसार पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे. मयत सुधीर जाधव रिक्षा व्यवसायीक होते. त्यांना वाचनाची आवड होती. काव्य, नाटीका इ. साहीत्य प्रकारात त्यांनी लेखन केले आहे. तसेच वृत्तपञात काही काळ बातमीदार म्हणून काम केले होते. त्यांच्या पश्चात वडील, पत्नी, मुलगा, मुलगी, भाऊ बहीण, भावजय, पुतण्या, पुतणी असा परिवार आहे.
