सावंतवाडी व वेंगुर्ला तालुक्यातील बंद असलेले सीसीटीव्ही कॅमेरे तात्काळ दुरुस्ती करून सुरू करावे…

अर्चना घारे परब; पोलीस अधीक्षकांचे निवेदनद्वारे वेधले लक्ष..

⚡सावंतवाडी ता.२४-: येथील शहरातील नागरिकांच्या हालचालींवर लक्ष ठेवणाऱ्या CCTV कमेऱ्यांपैकी तब्बल 51 कॅमेरे व वेंगुर्ला तालुक्यातील अनेक किनारपट्टीवरील कॅमेरे बंद आहेत. नागरिकांची व पर्यटकांची सुरक्षा अबाधित राहावी यासाठी सर्व CCTV कॅमेऱ्यांचे लवकरात लवकर मेंटेनन्स ऑडिट करावे व नादुरुस्त असलेले CCTV कॅमेरे लवकरात लवकर दुरुस्त करावेत अशी मागणी आज राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या कोकण विभागीय अध्यक्ष अर्चनाताई घारे यांनी सिधुदुर्ग जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल यांच्याकडे केली.

यावेळी त्यांनी CCTV च्या मेंटेनन्स ऑडिट सह 150 अतिरिक्त CCTV कॅमेरे प्राधान्याने बसवण्याचे आश्वासन दिले.

यावेळी राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष ॲड .रेवती राणे, सावंतवाडी तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी, वेंगुर्ला तालुकाध्यक्ष योगेश कुबल, युवती जिल्हाध्यक्ष सावली पाटकर, सावंतवाडी महिला शहराध्यक्ष ॲड. सायली दुभाषी, सावंतवाडी तालुका युवक उपाध्यक्ष विवेक गवस, तालुका चिटणीस समीर सातार्डेकर, अल्पसंख्याक सेल महिला तालुकाध्यक्ष मारिता फर्नांडिस, अल्पसंख्याक सेल उपाध्यक्ष इफ्तिकार राजगुरू, सोशल मिडिया जिल्हाध्यक्ष सचिन पाटकर, गौरांग शेर्लेकर, वैभव परब, शेखर परब, प्रकाश म्हाडगुत आदी पदाधिकारी उपस्थित होते.

You cannot copy content of this page