⚡कुडाळ ता.२४-:
महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ, गट कार्यालय चिपळूण अंतर्गत कामगार कल्याण केंद्र, कुडाळ आणि कुडाळ नगरपंचायतचे नगरसेवक उदय रामचंद्र मांजरेकर नगरसेवक संयुक्त विद्यमाने रविवार, २७ ऑगस्ट २०२३ रोजी सकाळी १० वाजता इमारत बांधकाम आणि इतर कामगारासाठी तसेच वॉर्ड मधील नागरिकांसाठी आरोग्य तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले आहे.
हे शिबिर ब्राम्हणदेव, खालची कुंभारवाडी, कुडाळ येथे आयोजित केले आहे. या शिबिरात सीबीसी (एच बी), थॉयरॉईड, कॅल्शियम, शुगर, बी.पी. चेकिंग पूर्णतः मोफत केले जाणार आहे. या आरोग्य शिबिराचा मोठ्या संख्येने नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन नगरसेवक उदय मांजरेकर यांनी केले आहे.
