जि प अध्यक्ष राजेंद्र म्हापसेकर यांची डी एस एन कार्यालयाला भेट…

प्रभारी अध्यक्षपद मिळाल्याबद्दल डी एस एन चॅनल व इलेक्ट्रॉनिक मीडियाने दिल्या शुभेच्छा

*💫दोडामार्ग दि.०५सुमित दळवी* दोडामार्ग तालुक्यातील भाजपाचे नेते व जि प अध्यक्ष राजेंद्र म्हापसेकर यांची जि प अध्यक्षपदी निवड झाली, त्यानंतर दोडामार्ग मध्ये त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले त्यांनतर त्यांनी दोडामार्ग मधील डी एस एन कार्यालयाला भेट देत शुभेच्छा स्विकारल्या व चहापान केले. याप्रसंगी डी एस एस चे संचालक/संपादक प्रमोद गवस यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देत स्वागत केले. यावेळी पत्रकार सुमीत दळवी, पत्रकार प्रशांत गवस, नारायण नाईक, राणे इन्श्युरन्सचे अमित राणे उपस्थित होते. म्हापसेकर यांनी आपणाला ही अध्यक्षपदाची संधी खासदार व भाजपाचे ज्येष्ठ नेते नारायण राणे यांच्यामुळे मिळाली असून दोडामार्ग तालुक्याच्या विकासासाठी आपण सतत कार्यरत राहू असे सांगताना आपल्या राजकीय कारकिर्दीच्या अनेक आठवणींना उजाळा दिला. डी एस एन चॅनलची टीम व इलेक्ट्रॉनिक मीडिया पत्रकारांकडून त्यांना भावी आयुष्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

You cannot copy content of this page