*💫मालवण दि.०५-:* एसी मशीन बॉक्स मध्ये जन्म दिलेल्या खारू ताई च्या पिल्लांना वाचविण्यासाठी पक्षीप्रेमी उदय रोगे यांनी एसी मशीनला बनविलेला कृत्रिम मार्ग त्या खारी साठी आपल्या पिल्लां दुसरीकडे सुरक्षित नेण्यासाठी मोलाचा ठरला. खार किंवा खारुताई अशा नावाने परिचित असलेली ही खार कोणाला आवडत नाही असे होऊ शकत नाही परंतु याच खारीने मालवण कुंभारमाठ येथील मोहन जोगी यांच्या एसीमध्ये जाऊन चक्क दोन पिल्लांना जन्म दिला. एसी बंद का झाला हे पाहत असताना त्यात घरटे असल्याचे दिसू लागले उंदरानी हे घरटे केले असावे असा अंदाज जोगी यांना आला. घरटया सारखा जमलेला कचरा बाहेर काढला परंतु आतल्या वायर कुरतडलेल्या पाहून त्यांनी एसी रिपेरिंग करणऱ्या कर्मचाऱ्यांला बोलावले कर्मचाऱ्यांने तो कचरा काढण्याचा प्रयत्न केला असता. त्याला त्यात दोन खारीची पिल्ले दिसली त्यावेळी त्यांनी आपले काम थांबविले मोहन जोगी यांना यात खारी ची पिल्ले आहेत ती गेल्यानंतर आपले काम करू असे सांगितले. याबाबत मोहन जोगी यांनी पक्षीप्रेमी उदय रोगे यांना माहिती दिली. त्यांनी त्या पिल्लांची पाहणी करून त्या पिल्लांना बाहेर काढण्यासाठी मार्ग बनविला. त्याच दिवशी संध्याकाळी त्या खारीने त्या कृत्रिम मार्गातून आपल्या दोन्ही पिल्लांना दुसऱ्या सुखरूप जागेवर नेऊन स्थलांतरित केले. अशा प्रकारे या खाडीच्या दोन्ही पिल्लांचे प्राण वाचविण्यात पक्षीप्रेमी उदय रोगे यांना यश आले. एसीतून बनविलेल्या कृत्रिम मार्ग त्या खारीच्या पिल्लांचा जीव वाचविण्यासाठी फार मोलाचा ठरला.
खारू ताईच्या पिल्लांना वाचविण्यासाठी उदय रोगे यांनी एसी मशीनला बनविला कृत्रिम मार्ग
