सर्व पक्षीयांची यशस्वी शिष्ठाई, कर्मचाऱ्याच्या चेहर्यावर आनंद..
⚡सावंतवाडी.ता.२२: येथील पालिकेच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांनी पुकारलेले काम बंद आंदोलन अखेर आज सायंकाळी पगार मिळाल्याने मागे घेतले,यावेळी सर्व पक्षीयांची शिष्टाई यशस्वी आली.
दरम्यान यावेळी राष्ट्रवादीचे पुंडलिक दळवी भाजपचे अजय गोंदावले, मनसेचे राजू कासकर, काँग्रेसचे समीर वंजारी, शिंदे भाजपचे बाबू कुडतरकर ठाकरे शिवसेनेचे शब्बीर, माने यांनी पुढाकार घेतला. आठवडाभरात पगार देण्याचे आश्वासन देऊन सुद्धा पगार न मिळाल्याने गेले दोन दिवस आंदोलन केले होते.अखेर आज सायंकाळी सर्वांना पगार प्राप्त झाल्याने त्यांनी सर्व राजकीय सामाजिक संघटनेचे आभार मानले.
