मालवण भरड नाका येथे फटाके फोडून व पेढे वाटत आंनद साजरा
⚡मालवण ता.२३-: भारताचे चांद्रयान ३ (विक्रम लँडर) चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वीपणे उतरल्यानंतर भारत हा चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणारा पहिला देश ठरला आहे. भारताच्या या ऐतिहासिक कामगिरीनंतर देशभरात जल्लोष होत असताना मालवण भरड येथेही नागरिकांनी एकत्र येत फटाके फोडून व पेढे वाटून आंनद साजरा केला.
यावेळी भाऊ सामंत, भिवा शिरोडकर, निलेश गवंडी, सहदेव बापर्डेकर, आंनद आचरेकर, रवींद्र केळुसकर, विलास मुणगेकर, प्रफुल्ल देसाई, अमित खोत, ओंकार यादव, सुशांत करंगुटकर, प्रकाश करंगुटकर, निलेश चव्हाण, चेतन मुणगेकर, नंदकुमार वस्त, दीपक माणगावकर, देवेंद्र चव्हाण, जयराम मसुरकर, संजय मिसाळ, विकी माळगावकर, अमित राणे, पपु बांदेकर, अनिता आळवे, श्री. पटेल यासह अन्य नागरिक उपस्थित होते.
भारतीय नागरिक म्ह्णून आमच्यासाठी हा अभिमानास्पद क्षण आहे. भारतीय अवकाश संशोधन संस्था (इस्रो) सर्व शास्त्रज्ञ तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन करत असल्याची भावना भाऊ सामंत, भिवा शिरोडकर यांनी व्यक्त केली आहे.
