बांदा/प्रतिनिधी
भारताच्या चंद्रयानाने चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वी लँडिंग केल्यानंतर बांदा शहर भाजपच्या वतीने कट्टा कॉर्नर चौकात फटाके फोडून व विजयी घोषणाबाजी करत जल्लोष साजरा करण्यात आला.
यावेळी सरपंच प्रियांका नाईक, माजी जिल्हा परिषद सदस्या श्वेता कोरगावकर, माजी सभापती शीतल राऊळ, शहर प्रमुख बाबा काणेकर, ग्रामपंचायत सदस्य रत्नाकर आगलावे, सिद्धेश महाजन, बाळा आकेरकर, गुरु धारगळकर, शामराव सावंत, विशाल मळेवाडकर, केदार कणबर्गी, सुहास आरोस्कर आदिसह भाजप कार्यकर्ते उपस्थित होते.
चंद्रयान ३च्या यशाबद्दल बांदा भाजपकडून आनंदोत्सव…
