चंद्रयान ३च्या यशाबद्दल सावंतवाडी भाजपकडून आनंदोत्सव…

अजय गोंदावळेंचा पुढाकार:भाजपा कार्यालयासमोर फटाके फोडून जल्लोष..

⚡सावंतवाडी ता.२३-: भारताच्या चंद्रयानाने चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वी लँडिंग केल्यानंतर सावंतवाडी शहर भाजपच्या वतीने येथील कार्यालयासमोर फटाके फोडून व विजयी घोषणाबाजी करत जल्लोष साजरा करण्यात आला. या विजयी जल्लोष अजय गोंदावळे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आला.

यावेळी माजी नगराध्यक्ष संजू परब, महेश धुरी मनोज नाईक आनंद नेवगी,दिलीप भालेकर,केतन आजगावकर,परिक्षत मांजरेकर, बंटी जामदार,हेमंत बांदेकर, आदी उपस्थित होते.

You cannot copy content of this page