कास उपसरपंच गजानन पंडीत यांचे निधन

⚡बांदा ता.२३-: कास उपसंरपंच गजानन नारायण पंडीत (वय 55) यांचे नुकतेच गोवा बांबोळी येथे अल्पशा आजाराने निधन झाले. पंडीत हे यापूर्वी ग्रामपंचायत सदस्य होते, सध्या ते उपसंरपंच म्हणून कार्यरत होते. 15 ऑगस्ट रोजी अचानक तब्यत बिघडल्यामुळे त्यांना उपचारासाठी गोवा बांबोळी येथे दाखल करण्यात आले होते.

अखेर आज उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, विवाहीत मुलगी, सुन, तिन भाऊ असा परीवार आहे.

You cannot copy content of this page