उपोषण सुरु असतांना एकाला चक्कर; उपजिल्हा रुग्णालयात उपचार हलविले
⚡सावंतवाडी.ता.२२: येथील पालिकेचे कंत्राटी कर्मचाऱ्यांनी आज पुन्हा काम बंद आंदोलन पुकारले आहे. आठवडाभरात पगार देण्याचे आश्वासन देऊन सुद्धा पगार न मिळाल्याने आपण पुन्हा आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे जोपर्यंत पगार दिला जात नाही तोपर्यंत आम्ही
कामावर हजर होणार नाही, असा इशारा त्यांनी यावेळी दिला आहे.दरम्यान त्यातील एक कर्मचाऱ्याला आता उपोषणाला बसले असताना त्यांना चक्कर येऊन तो खाली पडला तात्काळ नागरिकांनी त्याला उपजिल्हा रुग्णालय दाखल केले.
