⚡मालवण ता.२१-: विद्यार्थ्यांनी कुठच्याही क्षेत्रात सर्वोत्तम बनावे, आणि समाजाचे ऋण कायम ध्यानात ठेवावे, असे प्रतिपादन जयश्री जयराम धारपवार प्रतिष्ठानचे प्रमुख विश्वस्त डॉ. श्रीकांत जयराम धारपवार यांनी येथे बोलताना केले
वडाचापाट येथील श्री देवी शांतादुर्गा हायस्कूल मध्ये जयश्री जयराम धारपवार प्रतिष्ठानकडून गरजू आणि होतकरू विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती प्रदान करण्यात आली. प्रारंभी मान्यवरांचे स्वागत आणि प्रास्ताविक प्रशालेचे मुख्याध्यापक प्रसाद कुबल यांनी केले. सन २०१३ पासून श्री देवी शांतादुर्गा हायस्कूल मध्ये जयश्री जयराम धारपवार प्रतिष्ठानच्या वतीने विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यात येते. प्रतिष्ठानचे प्रमुख विश्वस्त डॉ. श्रीकांत जयराम धारपवार यांच्या हस्ते शिष्यवृत्ती प्रदान करण्यात आल्या. प्रशालेतील विद्यार्थिनी लतिका दीपक सावंत (इयत्ता-८ वी) कुमारी निकिता मंगेश पाताडे (इयत्ता ९ वी) आणि दुर्वेश संतोष म्हापणकर(इयत्ता १० वी) तसेच तनिषा सोनू वायंगणकर (शालांत माध्यमिक परीक्षा मार्च २०२३ प्रथम क्रमांक) यांना रोख रक्कम शिष्यवृत्ती देऊन गौरविण्यात आले. त्याचप्रमाणे लेखक डॉ.श्रीकांत जयराम धारपवार यांनी लिहिलेली दोन पुस्तके शाळेला भेट देण्यात आली.
शेवटी आभार शिक्षिका कु.प्रतिभा केळुसकर यांनी मानले. यावेळी प्रशालेतील शिक्षिका सौ. प्रीती सनये, पूजा कुडाळकर तसेच विद्यार्थी, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
