⚡कणकवली ता.२१-: संत रोहिदास चर्मकार सेवाभावी संस्थेची कणकवली तालुका कार्यकारणी निवड करण्यात आली आहे. यामध्ये तालुका अध्यक्ष मयुर चव्हाण व उपाध्यक्ष अमित जाधव ही पदे कायम ठेवत नवनिर्वाचित तालुका सचिव मारुती चव्हाण, कार्याध्यक्ष सागर चव्हाण, सहसचिव अमित जाधव, प्रसिध्दीप्रमुख प्रथमेश जाधव, सदस्य सुनील कदम, मधुकर चव्हाण, दत्ताराम करंजेकर, दत्ताराम जाधव, सिताराम जाधव आदींची निवड राज्याध्यक्ष संजय कदम यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देऊन करण्यात आली आहे.
नूतन पदाधिकाऱ्यांना यावेळी समाजाची संघटनात्मक बांधणी करत समाजाचे विविध प्रश्न मार्गी लावण्यासाठी काम करण्याचे मार्गदर्शन राज्याध्यक्ष संजय कदम यांनी केले.
यावेळी राज्यसचिव प्रसाद मसुरकर, राज्य खजिनदार रविंद्र पावसकर, राज्य उपाध्यक्ष पंढरी जाधव, कोकण विभाग सचिव सुभाष कसालकर ,जिल्हाध्यक्ष डॉ. प्रदीप बांबार्डेकर, जिल्हा सचिव अंकुश किंजवडेकर, जिल्हा कार्याध्यक्ष प्रा.दत्तकुमार फोंडेकर ,जिल्हा उपाध्यक्ष विठ्ठल चव्हाण, जिल्हा उपाध्यक्ष संतोष पावसकर, जिल्हा सहसचिव समीर बिबवणेकर, जिल्हा खजिनदार दर्शन कुडाळकर, तालुकाध्यक्ष मयुर चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते.
