सावंतवाडी,ता.२१-: येथील इन्सुली क्षेत्रफळ मधील वनविभागाच्या राखीव जंगलातील खैराची झाडे तोडणाऱ्या तिघांपैकी अटकेतील लवू एकनाथ गावडे रा.वेत्ये सावंतवाडी याला वन कोठडीनंतर न्यायालयीन कोठडी देण्यात आली होती,आज त्याची 25 हजारच्या सशर्त जामीनावर सुटका करण्यात आली. आरोपीच्या वतीने अँड. नीलिमा सावंत गावडे व अँड. अभिजित चव्हाण आणि कौस्तुभ गावडे यांनी काम पाहिले.
खैराची तोड प्रकरणी लवू गावडे याची जामिनावर सुटका
