⚡कणकवली ता.२१-: कणकवली अर्बन निधी बँकेच्यावतीने आयडियल इंग्लिश स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजमध्ये वृक्षारोपण उत्साहात पार पडले.
संस्थेचे चेअरमन डॉ. विद्याधर तायशेटे, कार्याध्यक्ष बुलंद पटेल, सल्लागार दीपक बेलवलकर , अशोक करंबेळकर, कणकवली अर्बन बँकेचे चेअरमन प्रा. हरिभाऊ भिसे, व्हॉइस चेअरमन प्राचार्य डॉ. सुभाष उर्फ बापू सावंत, सेक्रेटरी रंजन चव्हाण ,खजिनदार प्रीतम पारकर ,आयडियल इंग्लिश स्कूलच्या प्राचार्य अर्चना देसाई, संचालक सुरेखा भिसे, युगंधरा सावंत, प्राची पारकर, प्रांजल राणे भारती तांबे, सतीश मसुरकर, सौ मसुरकर, सौ. मेस्त्री सर्व संचालक कणकवली अर्बन बँक विविध सामाजिक उपक्रमामध्ये नेहमीच सहभागी असते वृक्षारोपण आरोग्य शिबिर असे विविध उपक्रम राबवले जातात या वृक्षारोपणमध्ये 50 झाडे आयडियल स्कूलच्या प्रांगणात लावण्यात आली.
