⚡सावंतवाडी ता.१६-: कारिवडे येथील ग्रामपंचायतीच्या समोर उपोषणाला बसलेल्या व्यक्तिने राष्ट्रगीताचा अवमान केला म्हणून पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अरविंद नारायण गावडे रा. कारिवडे गावठणवाडी असे त्याचे नाव आहे. त्याने खाजगी जमिनीतील खड्डा बुजवण्याच्या मागणीसाठी ग्रामपंचायत समोर स्वातंत्र्यदिनी सुरू केले होते.
दरम्यान सकाळी ध्वजारोहणावेळी राष्ट्रगीत सुरू असताना तो ध्वजस्तंभाजवळ बसूनच राहिला त्यांनी केलेल्या या प्रकाराबाबत ग्रामसेवक भरत बुंदे यांनी पोलिसात तक्रार दिली सदरचा प्रकार हा राष्ट्रगीताचा अवमान करणारा असल्याने पोलीस ठाण्यात त्याच्याविरोधात राष्ट्रगीत अवमान अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबतची माहिती पोलीस निरीक्षक ऋषिकेश अधिकारी यांनी दिली.
