वेटींग लिस्टचा घोळ संपवा आणि तिकिट बुकींगमध्ये होणारा काळा बाजार बंद करा

मनसे सरचिटणीस परशुराम उपरकर यांनी केली मागणी

⚡कणकवली ता.१६-: कोकणात गणपतीसाठी येणाऱ्या गाडयांचे बुकींग चार महिने अगोदर केले गेले असल्याने ८०० ते ८५० प्रवाशी वेटींग लिस्टवर आहेत. गणेशोत्सवानिमित्त सुरू होणाऱ्या नवीन गाडयांमध्ये सर्व वेटींग लिस्टवर असलेल्या प्रवाशांना वर्ग करण्यात यावे अशी मागणी मनसे सरचिटणीस माजी आम. परशुराम उपरकर यांनी सेंट्रल रेल्वे जनरल मॅनेजर यांच्याकडे केली आहे.वेटींग लिस्टचा घोळ संपवा आणि तिकिट बुकींगमध्ये होणारा काळा बाजार बंद करा अशीही मागणी केली आहे.

कोकण रेल्वेतून येणारे गणेशभक्त रेल्वेचे तिकिट ४ महिने अगावू बुक करत आहेत आणि बुकींग करत आहेत. मागिल काळात बुकींग एजंटांना घोळा बाबत बातम्या प्रसिद्ध झालेल्या आहेत. त्या घोळामध्ये कोकण रेल्वेच्या गाडया ऑनलाईन साईड ओपन झाल्यावर ५ ते १० सेकंदात गाडया फुल होतात. व ८०० ते ८५० प्रवासी बुकींग, वेटींग लिस्टवर राहते याबाबत आमच्या माहितीनुसार कोकणात येणाऱ्या गणेशभक्तांना तिकिटे वेळेत मिळत नाही व वेटींगवरील असलेले तिकिट कनफर्म होईल या आशेवरती असतात.वास्तविक पाहता रेल्वेची क्षमता ८०० ते १२०० असताना वेटिंग लिस्ट किती संख्येवर ठेवणे हे रेल्वेने आखले पाहिजे. ही तिकिटे कोणत्याही रेल्वेंना कनफर्म होणार नसल्याने वेटींग लिस्टचा कोटा कमी ठेवून रेल्वेचे बुकींग बंद करण्याची गरज असताना ८०० ते ८५० वेटींग लिस्ट ठेवून त्या असलेल्या प्रवाशांचे ४ महिने बुकींग केलेले वेटींगवर राहणाऱ्या प्रवाशांच्या तिकिटांच्या किंमतीचे व्याज कोकण रेल्वे मिळवत आहे. कोकणात गणपतीसाठी येणाऱ्या सर्व गाडयांचे अश्या प्रकारे बुकींग झालेले असल्याने कोकण रेल्वेने नवीन गाडया घोषणा होण्यापुर्वी या सर्व वेटींग लिस्ट प्रवाशांना ज्यादा गाडयांमध्ये अग्रक्रमाने सीट देण्यात यावी किंवा सर्व वेटींग लिस्टवर असलेले प्रवासी नवीन घोषित होणाऱ्या गाडयांमध्ये वर्ग करावेत.

नव्याने गाडी घोषित केल्यानंतर प्रत्येक वेळी बुकींग करताना गाडयांचे आरक्षण ५ सेकंदापुर्वी गाडया फुल दाखवल्या जातात. व त्यामुळे रेल्वेचे एजंट त्याचा मोठया प्रमाणात फायदा घेतात. जे जाणारे प्रवासी स्वत:हून तिकिटे ऑनलाईन बुक करतात व खिडकीवर उभे राहतात त्यांना तिकिटे मिळत नाही व त्यांची तिकिटे वेटींग लिस्टवर राहते. हा प्रकार वारंवार घडत असून सर्व प्रवाशांचे वेटींग लिस्ट ठेवून त्या प्रवाश्यांचे तिकिटाच्या पैशाचे व्याज रेल्वेला मिळत आहे. त्यामुळे वेटींग लिस्टचा कोटा कमी ठेवून रेल्वचे बुकींग रिग्रेट दाखवण्यात यावीत अन्यथा वेटींग लिस्टवर असलेल्या सर्व प्रवाशांना घोषीत होणाऱ्या गाडयामध्ये वर्ग करावे. वेटींग लिस्टचा घोळ संपवा आणि तिकिट बुकींगमध्ये होणारा काळा बाजार बंद करा अशी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे मनसे सरचिटणीस माजी आम. परशुराम उपरकर यांनी केली आहे.

You cannot copy content of this page