आम. नितेश राणे यांच्या शिफारशीने ५ कोटी रूपयांच्या निधीला मंजूरी

कणकवली विधानसभा मतदारसंघाचा विकास साधणार

⚡कणकवली ता.१६-: कणकवली विधानसभा मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी आम. नितेश राणे यांच्या शिफारशीने महाराष्ट्र शासनाने २५१५ योजनेअंतर्गत सन २०२३ / २४ मधून ग्रामीण भागातील विकासकामांसाठी ५ कोटी रूपयांच्या निधीला मंजूरी दिलेली आहे. अशी माहिती आम. नितेश राणे यांच्यामार्फत देण्यात आली आहे.


कणकवली विधानसभा मतदारसंघाअंतर्गत येणाऱ्या कणकवली, देवगड व वैभववाडी या तीन तालुक्यातील ग्रामिण भागातील विकासकामांसाठी आम.नितेश राणे यांच्या सातत्यपूर्ण केलेल्या पाठपुराव्यामुळे राज्य सरकारने ५ कोटी रूपयांचा निधी १४ ऑगस्ट २०२३ च्या शासन आदेशानुसार ग्रामिण भागातील मूलभूत सुविधा पुरविणाऱ्या कामांसाठी मंजूर करण्याचे आदेश कार्यासन अधिकारी अभिजित तेलवेकर यानी काढले आहेत. शासनाने उपलब्ध करून दिलेल्या या निधीमुळे ग्रामिण भागातील रखडलेल्या विकासकामांना चालाना मिळणार आहे. आम.नितेश राणे यांनी मोठ्या प्रमाणात विकासकामांसाठी निधी मंजूर करून आणल्यामुळे मतदारसंघाचा सर्वांगीण विकास करण्यात येत असल्याने ग्रामस्थांकडून याबाबत समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

You cannot copy content of this page