रस्तावाडी मित्रमंडळ व अष्टविनायक भजन मंडळ मळगावच्यावतीने राबविण्यात आला उपक्रम
⚡सावंतवाडी ता.१६ सहदेव राऊळ-: मळगाव रस्तावाडी मित्रमंडळ व अष्टविनायक भजन मंडळ मळगावच्यावतीने स्वातंत्र्यदिनानिमित्त मळगाव येथील शारदा विद्यालय मळगाव या जिल्हा परिषद शाळेला क्रीडा साहित्य संच भेट करून एक वेगळा असा स्तुत्य उपक्रम राबविण्यात आला.
होळी सणाच्या निमित्ताने या मंडळाच्यावतीने ‘शबय’ म्हणून जमवलेल्या पैशातून आणि काही व्यक्तींच्या देणगीतून हे क्रीडा साहित्य संच शाळेस भेट करण्यात आले. या संचात कॅरम बोर्ड, बॅडमिंटन सेट, क्रिकेट सेट, हॉलिबॉल, फुटबॉल, बुद्धीबळ सेट, लगोरी, दोरीउडी आदी क्रीडा साहित्याचा समावेश आहे.
या वाटपावेळी मळगाव रस्तावाडी मित्रमंडळ व अष्टविनायक भजन मंडळाचे सदस्य राजा राऊळ, निलेश चव्हाण, निलेश नाटेकर, दीपक राऊळ, शेखर राऊळ, सिद्धेश फेंद्रे, अर्थव धुरी तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका अनुराधा सुर्वे, शिक्षक अस्मिता गोवेकर, सीमा सावंत, रेश्मा गावडे, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य विवेक नार्वेकर, सच्चीदानंद मेस्त्री, शिक्षणप्रेमी विजय ठाकूर, पालक गजानन राऊळ, मनोज मळगावकर आदी उपस्थित होते. या वाटपाबद्दल शाळेच्या मुख्याध्यापिका अनुराधा सुर्वे यांनी या ग्रुपचे आभार व्यक्त केले. यावेळी अजूनही शाळेस काही मदत हवी असल्यास ती आपण करू, असे या ग्रुपच्यावतीने सांगण्यात आले.
