चला नवभारताच्या प्रगतीचा संकल्प करूया

युवा उद्योजक विशाल परब:स्वातंत्र्यदिनी मिलाग्रीस हायस्कूलला १ लाख ११ हजार १११ रुपयांची देणगी

⚡सावंतवाडी ता.१५-: भारतीय स्वातंत्र्य लढ्याचा इतिहास व महत्व विषद केले दरम्यान भारताचे माजी पंतप्रधान अटबिहारी वाजपेयी व विद्यमान पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांचा आदर्श डोळ्या समोर ठेवून नवभारताच्या प्रगतीच्या संकल्प करावा असे प्रतिपादन भाजप युवा नेते विशाल परब यांनी आज येथे केले.स्वातंत्र्य दिना निमित्त मिलाग्रीस हायस्कुल येथे भाजप युवानेते व उद्योजक श्री विशाल परब यांच्या हस्ते ध्वजारोहण पार पडले यावेळी श्री.परब बोलत होते.

दरम्यान प्रशालेच्या विविध लोकोपयोगी कामांसाठी १,११,१११/- रुपयाची देणगी सुपूर्द केली.

तसेच यावेळी व्हॉईस प्रिन्सिपॉल सिस्टर नेबल तसेच सुपर वाइझर मेघना राऊळ व इतर मान्यवर उपस्थित होते.

You cannot copy content of this page