स्वातंत्र्यदिनाचे निमित्ताने वन विभाग सावंतवाडी व गवाणकर कॉलेज यांचे कडून वृक्षारोपण…

⚡सावंतवाडी ता.१६-: सावंतवाडी वन विभाग व गवाणकर कॉलेज यांचे संयुक्त विध्यमाने स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून नरेंद्र डोंगरावर कोकम, आंबा, जांभूळ, काजू, इ. विविध फळरोपांचे वृक्षारोपण करण्यात आले. यासाठी सावंतवाडी वनपरिक्षेत्रातील सर्व अधिकारी, कर्मचारी व गवाणकर कॉलेज चे शिक्षक तसेच 80 विद्यार्थी उपस्थित होते.


या वृक्षारोपणा नंतर वनपरिक्षेत्र अधिकारी सावंतवाडी यांनी उपस्थित विद्यार्थ्यांशी पर्यावरण संवर्धन, जैवविविधता, तसेच जैवविविधतेचा समतोल अबाधित राहण्यासाठी आपण पार पाडावयाची कर्तव्ये याबाबत संवाद साधला. विद्यार्थी, शिक्षकवृंद यांनीदेखील वन अधिकारी, कर्मचारी यांना त्यांच्या शंक, प्रश्न विचारून त्याचे निरसन करून घेतले. त्यानंतर गवाणकर कॉलेजच्या विद्यार्थी व शिक्षक यांनी उपस्थित सर्वांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

You cannot copy content of this page