⚡सावंतवाडी ता.१४-: ‘मेरी मिट्टी मेरा देश अभियान’ देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी समारोप अभियान या उपक्रमा अंतर्गत आज वेत्ये ग्रामपंचायतीच्या वतीने ध्वज वंदन, शिला फलक अनावरण, वृक्षारोपण, पंचप्रण शपथ कार्यक्रम संपन्न झालेत.
दरम्यान ग्रामपंचायत सभागृहात माजी स्वातंत्र्य सैनिक, सेवानिवृत्त सैनिक, माजी सैनिकांचे कुटुंबीय, पोलीस कर्मचारी यांचे सत्कार करण्यात आले.
यावेळी सरपंच गुणजी गावडे ग्रामपंचायत सदस्य तसेच ग्रामस्थ मोठी संख्येने उपस्थित होते
