संदीप गावडेंचे आयोजन; पालकमंत्री रवींद्र चव्हाणांची प्रमुख उपस्थिती
⚡सावंतवाडी ता.१४-: भाजपचे युवा नेते संदीप गावडे यांच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेली राज्यस्तरीय स्पर्धेचा उद्या स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने रंगणार आहे.
या वेळी स्पर्धेला उस्फूर्त मिळालेला प्रतिसाद लक्षात घेता प्रकाशझोताची सोय करण्यात आली आहे.
या स्पर्धेच्या निमित्ताने पालकमंत्री तथा राज्याचे बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण उपस्थित राहणार आहेत अशी माहिती अनिकेत आसोलकर यांनी दिली.
सावंतवाडी येथील जिमखाना मैदानावर 15 व 16 ऑगस्टला ही फुटबॉल स्पर्धा रंगणार आहे या स्पर्धेसाठी सिंधुदुर्ग रत्नागिरी कोल्हापूर याठिकाणी गोव्यातील अनेक संघ सहभागी झाले आहे या स्पर्धेसाठी प्रथम पारितोषिक 50 हजर तर द्वितीय पारितोषिक 25 हजार ठेवण्यात आले 5000 रुपयाची वैयक्तिक पाच बक्षीस देण्यात येणार आहे या स्पर्धेसाठी पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्यासह अनेक राजकीय मान्यवर व क्रीडा शिक्षक उपस्थित राहणार आहेत तर या स्पर्धेच्या दरम्यान उपस्थित फुटबॉल खेळातील जुन्यादान त्या खेळाडूंसह पंच व क्रीडा शिक्षकांचा सत्कार करण्यात येणार आहे याबाबतची
त्यामुळे जास्तीत जास्त फुटबॉल पट्टूनी या वेळी उपस्थित रहावे असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे यावेळी गेळे सरपंच सागर ढोकरे वैभव राऊळ,अमरेश आसोलकर
चैतन्य सावंत हेमंत पांगम सचिन मोरजकर ओंकार पुरलकर आदी उपस्थित होते
