पाडलोसमध्ये पाईपलाईनच्या कामाचा वाहनचालकांना धोका..

शिवसेना उपतालुकप्रमुख राजू शेटकर:तात्काळ सुधारणा न झाल्यास काम बंद पाडणार..

⚡बांदा ता.१४-: पाडलोच मडुरा मार्गावरील रस्त्याच्या बाजूने महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या पाईपलाईनचे काम धोकादायक पद्धतीने सुरू आहे. रस्त्याला खेटून खोदाई केलेल्या ठिकाणी कोणताही सुरक्षा फलक किंवा सूचना फलक लावण्यात आला नाही. अपघात झाल्यास सर्वस्वी प्राधिकरण कंपनी जबाबदार राहील तसेच कामकाजाच्या ठिकाणी सुरक्षेच्या दृष्टीने उपायोजना न केल्यास काम त्वरित बंद पाडू असा इशारा पाडलोस उपसरपंच तथा शिवसेना सावंतवाडी उपतालुकाप्रमुख राजू शेटकर यांनी दिला.


पाडलोस येथे पाईपलाईनचे काम धोकादायक पद्धतीने सुरू असल्याच्या अनेक तक्रारी ग्रामपंचायत प्रशासनाकडे आल्या. प्रत्यक्ष पाहणी केली असता प्राधिकरण जीवित हानी होण्याची वाट पाहते की काय अशी परिस्थिती आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांचा कामावर लक्ष नसल्याने मनमानी कारभार सुरू आहे. धोकादायकरित्या सुरू असलेल्या ठिकाणी वाहन खड्ड्यात पडून अपघात होऊ शकतो. एकंदरीत आंधळ दळतय आणि कुत्र पीठ खातं अशा पद्धतीने काम सुरू असून कामात सुधारणा झाल्यास काम तात्काळ बंद पाडू असा इशारा व पाडलोस उपसरपंच राजू शेटकर यांनी दिला.

You cannot copy content of this page