मेरी मिट्टी मेरा देश अभियानांतर्गत बांद्यात विविध कार्यक्रम संपन्न…

बांदा/प्रतिनिधी
‘मेरी मिट्टी मेरा देश अभियान’ देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी समारोप अभियान या उपक्रमा अंतर्गत आज बांदा ग्रामपंचायतीच्या वतीने ध्वज वंदन, शिला फलक अनावरण, वृक्षारोपण, पंचप्रण शपथ कार्यक्रम संपन्न झालेत.
आज सकाळी ८ वाजता ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष अन्वर खान यांच्याहस्ते ध्वजवंदन करण्यात आले. तर शिला फलक अनावरण माजी सैनिक गोविंद वराडकर यांच्याहस्ते करण्यात आले.

वसुधा वंदन अंतर्गत अटलबिहारी वाजपेयी उद्यानात ७५ औषधी व मसाले वृक्षांची लागवड मान्यवरांच्या हस्ते करण्यात आली. तसेच कलशामध्ये गावातील माती गोळा करण्यात आली. सौ. रुपाली शिरसाट यांनी पंचप्रण शपथ दिली. तर येथील जिल्हापरिषद केंद्रशाळा बांदा नं. १ च्या विद्यार्थ्यांनी विविध देशभक्तीपर कार्यक्रम सादर केले. दुपारी १२ वाजता ग्रामपंचायत सभागृहात माजी स्वातंत्र्य सैनिक, सेवानिवृत्त सैनिक, माजी सैनिकांचे कुटुंबीय, पोलीस कर्मचारी यांचे सत्कार करण्यात आले.
यावेळी सरपंच प्रियांका नाईक, उपसरपंच जावेद खतीब, ग्रामपंचायत सदस्य साईप्रसाद काणेकर, सौ. रुपाली शिरसाट, राजाराम उर्फ आबा धारगळकर, रत्नाकर आगलावे, प्रशांत बांदेकर, शामसुंदर मांजरेकर, देवल येडवे, रेश्मा सावंत, दीपलक्ष्मी पटेकर, श्रेया केसरकर, तनुजा वराडकर, शिल्पा परब, रिया येडवे, माजी जिल्हा परिषद सदस्य श्वेता कोरगावकर, ग्रामविस्तार अधिकारी लीला मोर्ये, तलाठी फिरोज खान, सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष अनय स्वार, ग्रामपंचायत कर्मचारी संजय सावंत यांच्यासह ज्येष्ठ नागरिक, माजी सैनिक आणि बांदा शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

You cannot copy content of this page