प्रा.हरी नरके यांच्या अकाली निधनाने समतेच्या चळवळीतील आघाडीचा शिलेदार हरपला-:पी. के. चौकेकर

मालवण दि प्रतिनिधी
प्रा.हरी नरके यांच्या अकाली निधनाने समतेच्या चळवळीतील आघाडीचा शिलेदार हरपला आहे असे प्रतिपादन बसपाचे जिल्हा अध्यक्ष पी. के. चौकेकर यांनी येथे बोलताना केले

नामवंत साहित्यिक, परिवर्तनवादी विचारवंत महात्मा फुले समता परिषदेचे राष्ट्रीय नेते प्रा. हरी नरके यांचे नुकतेच निधन झाले. मालवण येथील फुले शाहू आंबेडकर विचारमंच, भारतीय बौद्ध महासभा, बहुजन समाज पार्टी, चर्मकार उन्नती मंडळ या संघटनांच्या वतीने त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी समाज मंदिर येथे शोकसभेचे आयोजन बसपाचे जिल्हा अध्यक्ष पी. के. चौकेकर यांच्या अध्यक्षतेखाली केले त्यावेळी श्री. चौकेकर बोलत होते.

यावेळी व्यासपीठावर प्रा.कैलास राबते, नरेंद्र पेंडूरकर, विचारमंचच्या महिला अध्यक्ष सौ. नेहा तांबे, सचिव संजय जाधव उपस्थित होते. प्रारंभी प्रास्ताविक सचिव संजय जाधव यांनी केले

श्री. चौकेकर पुढे म्हणाले प्रा. नरके यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा फुले यांच्या कार्याचा अभ्यास करून ओबीसी समाजाला हक्क अधिकार मिळवून देण्यासाठी फार मोठे योगदान दिले . ते महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य होते. मराठी भाषेला भारतीय भाषा सिध्द करण्यासाठी नेमलेल्या रंगनाथ पठारे समितीचे समन्वयक म्हणून त्यांनी काम पाहिले होते. ओबीसींच्या राष्ट्रीय पातळीवरील महात्मा फुले समता परिषदेचे पदाधिकारी होते.
यावेळी सिध्दार्थ जाधव यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले दिवंगत नरके सरांचे अभ्यासपूर्ण भाषण, इतिहासाची पुराव्यानिशी मांडणी असायची त्यामुळे ते आपल्या मतावर ठाम असल्याचे त्यांच्या व्याख्यानातून अनेक सामाजिक कार्यकर्ते चळवळीमध्ये सक्रिय झाले. मालवणमध्ये जे सामाजिक कार्य सुरू आहे त्यामध्ये नरके सरांचा सिंहाचा वाटा आहे.

बसपाचे सुधाकर माणगावकर यांनी नरके सरानी प्रतिकुल परिस्थितीत शिक्षण घेऊन फुले शाहू आंबेडकर चळवळीतील योगदानाबद्दल माहिती दिली. यावेळी प्रा. राबते, नरेंद्र पेंडूरकर, रंजन तांबे, सतिश वाघमारे यांनी मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय जाधव यांनी केले. तर भारतीय बौद्ध महासभेचे माजी जिल्हा सचिव विलास वळंजू यांनी आभार मानले.
शोकसभेला भारतीय बौद्ध महासभेचे मालवण तालुका प्रभारी पुरुषोत्तम मालवणकर, बबन मालवणकर, संतोष मालवणकर, फुले शाहू आंबेडकर विचारयमंचे सौ. दर्शना गुळवे, सौ. भारती जाधव, संतोष जाधव, मारुती सोनवडेकर, रविंद्र मालवणकर, अशोक मोरे, बाळा कोळंबकर, श्रीकांत मालवणकर चर्मकार उन्नती मंडळाचे विजय जाधव आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

You cannot copy content of this page