पुर्वजांनी वृक्ष संवर्धनातून दिलेला मंत्र पुढील पिढीने आचरावा-: दिपक सुर्वे

⚡मालवण ता.१४-: पुर्वजांनी वृक्ष लागवड केली म्हणूनच आपण त्यांची गोड फळे खाऊ शकतो. त्यांचा हा वृक्षसंवर्धनाचा मुलमंत्र पुढील पिढीनेही आचरणात आणल्यास पर्यावरणाचे संवर्धनासाठी दुसरया कुठल्याही गोष्टींची गरज भासणार नाही. असे मत चिंदर प्रभारी सरपंच दिपक सुर्वे यांनी चिंदर येथे व्यक्त केले.

मेरी मिट्टी मेरा देश कार्यक्रमांतर्गत चिंदर ग्रामपंचायत येथे सकाळी ध्वजारोहण आणि शिलाफलकाचे अनावरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
यावेळी त्यांच्या सोबत गटविकास अधिकारी आपासाहेब गुजर,कृषी विभागाचे संजय गोसावी,विस्तार अधिकारी सुरज बांगर,प्रभाकर जाधव ,ग्रामविकास अधिकारी मंगेश साळसकर, सोसायटी चेअरमन हडकर,ग्रामपंचायत सदस्य तसेच शिक्षक ग्रामस्थ आदी उपस्थित होते.
या कार्यक्रमात हातात पणती घेऊन पंचप्राण शपथ,विविध मान्यवरांचे सत्कार आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या नंतर गावठणवाडी,भटवाडी दिंडी मंडळे आणि चिंदर गावातील सर्व शाळांमधील विद्यार्थी शिक्षकांच्या सहभागाने ढोल ताशांच्या गजरात आणि वृक्षसंवर्धनाच्या घोषणांनी वृक्ष दिंडी काढण्यात आली .

यावेळी विठ्ठल रखुमाई सह सहभागींनी वृक्ष हातात घेत वृक्षसंवर्धनाच्या घोषणा देत पालकरवाडी येथे ७५वृक्षांचे वृक्षारोपण करण्यात आले.

You cannot copy content of this page