मंगलदास पेडणेकर वगैरे 21 यांचे 15 ऑगस्ट रोजी चे उपोषण स्थगित…

⚡सावंतवाडी ता.१४-: 15 ऑगस्ट 2023 रोजी ग्रामपंचायत तळवडे येथील मंगलदास पेडणेकर, शंकर सावंत, प्रमोद मेस्त्री, दीपक लोके, सत्यवान आंगचेकर, रुपेश सावंत, शिवराम दळवी, विकास गावडे, सुशांत गावडे,यांनी पुकारलेले उपोषण तूर्तास स्थगित ठेवले आहे.

प्रशासनाने 90% स्ट्रीटलाईट काम पूर्ण केले असून शिल्लक काम 30/08/2023 पर्यंत पूर्ण करण्याचे लेखी आश्वासन उपोषणकर्ते यांना आज दिल्याने सदरचे उपोषण तूर्तास स्थगित ठेवत असल्याचे शंकर सावंत यांनी कळविले आहे.

You cannot copy content of this page