ग्रामपंचायतीने क्युआर कोडसाठी पुढे यावे; संचालक महेश सारंग यांचे आवाहन..
⚡सावंतवाडी ता.१४-: तालुक्यात एकुण ६३ ग्रामपंचायती असुन प्रत्येक ग्रामपंचायतीसाठी क्युआर कोड उपलब्ध करुन दिले जाणार आहेत. अशी माहिती जिल्हा बँक संचालक महेश सारंग यांनी दिली. त्यांच्या ग्रामपंचायत कारिवडेसाठी सरपंच सौ.आरती माळकर यांचेकडे क्यु आर कोड वितरीत करण्यात आला आहे यावेळी ते बोलत होते.
ते म्हणाले, क्युआर कोडसाठी आवश्यक कागद पत्रांचा नमुना संच तालुक्यातील ग्रामपंचायतमध्ये पोहचविण्यात आला आहे. टप्प्याटप्प्याने सर्व ग्रामपंचायत क्यू आर कोड जोडण्यात येणार आहेत
त्यामुळे ग्रामस्थांना नळपाणी,तसेच ग्रामनीधी भरणा करणे सोपे जाणार आहे.यामुळे वेळ तर वाचणार आहेच परंतु, व्यवहारामध्ये अधिक पारदर्शकता येउन सर्वांसाठी व्यवहार सोयीचे होतील. आजपर्यंत सावंतवाडी तालुक्यातील आंबेगाव,
कोलगाव,माडखोल,सरमळे,ओटवणे,सोनुर्ली,मळेवाड कोंडुरे,कारिवडे इ.ग्रामपंचायतींना क्यु आर कोड बँकेने उपलब्ध करुन दिलेले आहेत. उर्वरित ग्रामपंचायतींनी लवकरात लवकर आवश्यक कागदपत्रासह नजिकच्या सिंधुदूर्ग बँकेच्या शाखेत संपर्क साधुन क्यु आर कोड बाबत मागणी करावी.
