मंत्री दीपक केसरकर: एसटी स्टँड परिसराची केली पाहणी
⚡सावंतवाडी ता.१४-: सावंतवाडी आगार सुसज्ज बनवण्यात येणार आहे त्यासाठी आराखडा तयार करण्यात येणार आहे या पार्श्वभूमीवर शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी एसटी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक शेखर चंन्ने यांच्यासोबत सावंतवाडी आगाराला भेट दिली
एसटी महामंडळाचे मुख्य वास्तू विशारद महेश एसटी मंडळाचे विभागीय व्यवस्थापक अभिजीत पाटील अभियंता मीना सोनवणे तसेच राजन पोकळे गजानन नाटेकर नंदू गावडे आधी उपस्थित होते
मुंबईत बैठक असल्याने केसरकर यांनी भेट आटोपती घेत मुंबईला रवाना झाले यावेळी जिल्हाधिकारी के मंजू लक्ष्मी यांच्यासह व्यवस्थापकीय संचालक चेन्न यांनी आगाराला भेट देत नियोजित आराखड्या बाबत माहिती दिली.
