किर्लोस ग्रामपंचायत येथे विविध कार्यक्रम साजरे

⚡कणकवली ता.१४-: मेरी मिट्टी मेरा देश हा कार्यक्रम किर्लोस ग्रामपंचायत येथे साजरा करण्यात आला .यावेळी सकाळी ध्वज फडकविण्यात आला.त्यानंतर ९ वाजता वृक्षारोपण ग्रामपंचायत येथे करण्यात आले. ९.३० वा. वीर जवान यांचे शिलाफलक उद्घाटन करण्यात आले.

१० वा. माजी सैनिक सत्कार सोहळा संपन्न झाला. यावेळी किर्लोस सरपंच सौ साक्षी चव्हाण, उपसरपंच अजित लाड, ग्रा. प.सदस्य प्रविण घाडीगावकर, गुरु चव्हाण, सौ .नुतन घाडीगावकर, सौ. मानसी भावे, किर्लोस ग्रामसेवक व कर्मचारी व पोलिस पाटील किशोर लाड आणि ग्रामस्थ शशिकांत भावे, मोहन लाड , सोसायटी चेअरमन स्वानंद भावे, मंगेश घाडीगावकर, आंनद मालणकर, हेमंत खावणेकर, चंद्रकांत घाडीगावकर आणि सर्व शाळेतील मुले शिक्षक राणे, असरोडंकर, कदम,माजी सैनिक गोपाळ किर्लोस्कर व पांडुरंग वारंग, माजी पोलीस अनाजी कदम व अंगणवाडी सेविका व किर्लोस गावातील ग्रामस्थ उपस्थित होते.

You cannot copy content of this page