या कार्यक्रमाच्या व्यासपिठावर प्रमुख पाहूणे म्हणून महादेव परब, मंडळाचे अध्यक्ष चंद्रकांत सावंत, कार्याध्यक्ष गणपत गांवकर, सरचिटणीस रामचंद्र गावकर, उपाध्यक्ष नितीन सावंत, खजिनदार गुरुनाथ गावडे, सहसचिव सचिन भाईप, सल्लागार आत्माराम उर्फ बापू गावकर, गंगाराम बिरोडकर आदी मान्यवर उपस्थित होते.
यावर्षी जेष्ठ चाकरमानी ग्रामस्थ म्हणून सोमा लिंगोजी सुतार यांची निवड करण्यात आली. मंडळाचे अध्यक्ष चंद्रकांत सावंत यांच्याहस्ते त्यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. तसेच दरवर्षी प्रमाणे निवड केलेल्या जेष्ठ ग्रामस्थ सोमा सुतार यांना छत्री व टोपी अर्जुन (तात्या) गांवकर यांनी भेट म्हणून दिली.
यावेळी दहावी, बारावी आणि पदवी परीक्षा उत्तीर्ण झालेल्या वैष्णवी रामदास झोळंबेकर, रिद्धी मंगेश धुरी, आतिश बाळकृष्ण गावकर, सुबोध गुरुनाथ गावडे, हर्षाली बापू सावंत, तन्वी गुरुनाथ गावडे, शुभम शंकर नाईक, आर्यन उमेश गावकर या चाकरमान्यांच्या मुलांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मानपत्र पुष्पगुच्छ व भेटवस्तु देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी सोमा सुतार यांनी मंडळाच्या विविध उपक्रमांचे कौतुक करून जेष्ठ ग्रामस्थ म्हणून आपला सन्मान केल्याबद्दल मंडळाचे आभार मानले. प्रा नितीन सावंत यांनी बारावी नंतर पुढे उपलब्ध असलेले अभ्यासक्रम व संधी याबाबत बहुमोल मार्गदर्शन केले.तसेच गुणवंत विद्यार्थ्यांमधुन तन्वी गावडे हिने आपले मनोगत व्यक्त करताना मंडळाचे आभार मानले .
⚡सावंतवाडी ता.१४-: मुंबईस्थित ओटवणे ग्रामस्थांच्या ओटवणे ग्रामस्थ मंडळ (मुंबई) चा २४ वा वार्षिक पारितोषिक वितरण सोहळा बोरिवली पूर्व देवीपाडा येथील शिवशक्ती विकास मंडळाच्या सभागृहात उत्साहात संपन्न झाला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मंडळाचे अध्यक्ष चंद्रकांत सावंत आणि सुत्रसंचालन मंडळाचे सरचिटणीस रामचंद्र गांवकर यांनी तर आभार कार्याध्यक्ष गणपत गांवकर यांनी मानले.
