कुडाळ येथील घटना; दुचाकीस्वार जखमी
⚡कुडाळ ता.१४-:मुंबई-गोवा महामार्गावर कुडाळ आरएसएन चौक येथे आज दुपारी १.१५ च्या सुमारास भीषण अपघात झाला असून यामध्ये गंभीर जखमी झाला आहे. प्राप्त माहितीनुसार, कुडाळ शहरातून हायवेच्या दिशेने जाणाऱ्या ट्रकला दुचाकीने मागच्या साईडने जोरदार धडक दिली.
या धडकेत दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला असून त्याला आता ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. प्राप्त मिळालेल्या माहितीनुसार, सदर जखमीचे नाव अरुण पवार असून तो कुडाळ तालुक्यातील हिर्लोक येथील रहिवासी आहे.
