रोटरीच्या समरगीत स्पर्धेत मोहनराव परुळेकर प्राथमिक शाळा व ओझर विद्यामंदिर विजेते

स्पर्धेला मालवण तालुक्यातील शाळांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

⚡मालवण ता.१३-: स्वातंत्र्य दिनानिमित्त रोटरी क्लब मालवण तर्फे घेण्यात आलेल्या ‘शालेय समरगीत समूहगायन’ स्पर्धेस मालवण तालुक्यातील शाळांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या स्पर्धेत प्राथमिक गटात मालवण येथील मोहनराव परुळेकर प्राथमिक शाळेने तर माध्यमिक गटात कांदळगाव येथील ओझर विद्यामंदिर ने प्रथम क्रमांक पटकावला.

मालवण येथील स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालय येथे ही स्पर्धा पार पडली. ही स्पर्धा लिमये हॉस्पिटलचे रोटरीयन डॉ. अजित लिमये व डॉ. लीना लिमये यांनी पुरस्कृत केली होती. या स्पर्धेत प्राथमिक गटात भंडारी प्राथमिक शाळा मालवण, प्राथमिक कन्याशाळा मालवण, जय गणेश इंग्लिश मीडियम स्कुल मालवण, मोहनराव परुळेकर प्राथमिक शाळा मालवण तर माध्यमिक गटात माध्यमिक गट वराडकर हायस्कूल कट्टा, केंद्र शाळा मसुरे, जि. प. पूर्ण प्राथ. शाळा, दांडी, शिवाजी विद्यामंदिर काळसे, माध्यमिक कन्याशाळा, टोपीवाला हायस्कुल मालवण, जय गणेश इंग्लिश मीडियम स्कुल मालवण, डॉ. दत्ता सामंत स्कूल, देवबाग, चौके हायस्कूल, भंडारी ए. सो. हायस्कुल मालवण, ओझर विद्यामंदिर कांदळगाव, रेकोबा माध्यमिक विद्यालय, वायरी या एकूण १६ शाळांच्या संघांतून १८६ विद्यार्थी सहभागी झाले होते. यावेळी सर्व सहभागी शाळांच्या मुलांनी विविध समरगीते उत्तमरित्या सादर केली. स्पर्धेचे परीक्षण श्री. संजय आठले, श्री. शाम तेंडोलकर (दोन्ही कुडाळ) यांनी केले. सूत्रसंचालन रो. प्रा. उज्ज्वला सामंत व रो. महादेव पाटकर यांनी केले.

स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे – प्राथमिक गट- प्रथम- मोहनराव परुळेकर प्राथमिक शाळा, द्वितीय- भंडारी प्राथमिक शाळा, तृतीय – प्राथमिक कन्याशाळा, उतेजनार्थ- जय गणेश इंग्लिश मीडियम. माध्यमिक गट- प्रथम – ओझर विद्यामंदिर कांदळगाव, द्वितीय – टोपीवाला हायस्कुल, तृतीय – वराडकर हायस्कूल, कट्टा, उतेजनार्थ प्रथम- भंडारी हायस्कुल, उतेजनार्थ द्वितीय – रेकोबा माध्यमिक विद्यालय. सर्वोत्कृष्ट वादक – श्री. सुधीर गोसावी (टोपीवाला हायस्कूल).

सर्व विजेत्या संघाना मान्यवरांच्या हस्ते रोख रुपयांची पारितोषिके व डॉ. लिमये चषक देऊन गौरविण्यात आले. यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शिवराम ठाकूर यांच्यासह रोटरी क्लब मालवणचे अध्यक्ष अभय कदम, डॉ. अजित लिमये, डॉ. लीना लिमये, रतन पांगे, सुहास ओरसकर, महादेव पाटकर, उमेश सांगोडकर, प्रसन्न मयेकर, अभय कवटकर, रमाकांत वाक्कर, प्रा. उज्ज्वला सामंत या रोटरी सदस्यांसह प्रा.अन्वेशा कदम, गौरी पाटकर, भाग्यश्री राणे, प्रणाली चव्हाण आदी तसेच शिक्षक व पालक उपस्थित होते.

You cannot copy content of this page