⚡वेंगुर्ला ता.१३-: शैक्षणिक क्षेत्राचा विकास करावयाचा असेल तर उपलब्ध सुविधांचा योग्य उपयोग करून घ्या. विद्यार्थ्यांच्या विकासासाठी व शिक्षणासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी काम करीत आहेत. वाईट गोष्टींमध्ये न गुरफटता योग्य मार्ग निवडून आपल्या व देशाच्या प्रगतीसाठी प्रयत्न करा,असे प्रतिपादन कोकण शिक्षक मतदार संघाचे आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी वेंगुर्ला येथे केले.
भाजपा वेंगुर्ला आणि कोकण कला व शिक्षण विकास संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने वेंगुर्ला तालुक्यातील दहावी-बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा व शालांत परीक्षेमध्ये १०० टक्के निकाल लागलेल्या प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालय मुख्याध्यापकांचा स्वामिनी मंडपम येथे सन्मान करण्यात आला. यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, माजी आमदार राजन तेली, कोकण कला व शिक्षण विकास संस्थेचे अध्यक्ष दयानंद कुबल, भाजपाच्य प्रदेश कार्यकारिणी सदस्य शरद चव्हाण, जिल्हा सरचिटणीस प्रसन्ना देसाई, माजी नगराध्यक्ष राजन गिरप, तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर, जेष्ठ नागरिक संघाचे शामराव काळे, मुख्याध्यापक संघाचे वामन तर्फे, सचिव गुरुदास कुसगावकर, प्रदीप शिंदे, एम.जी.मातोंडकर, बॅ.खर्डेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आनंद बांदेकर, जिल्हा कार्यकारिणी सदस्य वसंत तांडेल, साईप्रसाद नाईक, माजी नगरसेवक प्रशांत आपटे, श्रेया मयेकर, साक्षी पेडणेकर, सरपंच संघटनेचे पप्पू परब, खरेदी विक्री संघाचे चेअरमन ज्ञानेश्वर केळजी, महिला मोर्चाच्या सारीका काळसेकर, प्रार्थना हळदणकर, रसीका मठकर, तालुका उपाध्यक्ष मनवेल फर्नांडीस, तालुका सरचिटणीस प्रशांत खानोलकर व बाबली वायंगणकर, अणसुर सरपंच सत्यविजय गावडे, माजी सरपंच मनोज उगवेकर, नितीन चव्हाण, विजय रेडकर, किसान मोर्चाचे बाळु प्रभू, युवा मोर्चाचे समीर नाईक व हेमंत गावडे, अल्पसंख्याक सेलचे सायमन आल्मेडा, सत्यवान परब, दिलीप परब, नंदा गावडे, संदिप देसाई आदी उपस्थित होते.
यावेळी वेंगुर्ला तालुक्यातील १० वी १२ वीतील ११६ गुणवंत विद्यार्थांचा तसेच २० मुख्याध्यापकांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. या कार्यक्रमाला मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षणप्रेमी नागरिक व भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. सचिन परुळकर यांनी व वसंत तांडेल यांनी आभार मानले.
