Headlines

तलाठी परीक्षेचा सावळा गोंधळ…

सिंधुदुर्गात ३ मंत्री पण एकाचाही जिल्ह्याला काडीचाही उपयोग नाही;तलाठी परीक्षा केंद्रच सिंधुदुर्गात नाही हे जिल्ह्यातील मंत्र्यांच यश;योगेश धुरी..

⚡कुडाळ ता.१२-: हे सरकारच आमचे नाही, हे सरकार गुजराती लोकांचे भले करण्यासाठी आहे. तलाठी परीक्षेसाठी सिंधुदुर्ग जिल्हयात परीक्षा केंद्रच नाही, हे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मंत्र्यांचे यश म्हणावे लागेल, अशी उपरोधिक टीका कुडाळ तालुका युवासेना तालुकाप्रमुख योगेश धुरी यांनी केली आहे.

तलाठी परीक्षेसाठी सिंधुदुर्ग जिल्हा केंद्र नसल्याने येथील तरुणांना-तरुणींना कोल्हापूर, मुंबई, रत्नागिरी, रायगड अशा ठिकाणी जाऊन परीक्षा द्यावी लागणार आहे. येथे जाताना प्रवास खर्च राहण्याचा खर्च असा भूर्दंड मुलांना पडणार त्यात परीक्षा शुल्क १ हजार रु. असून एवढा खर्च करून सिंधुदुर्गतील मुले म्हटल्यावर त्याच्यावर आधीच फुली बसते. हे सरकार युवकांच भले नाही तर सत्यनाश करण्यासाठी कार्यरत आहे. अशा सरकारचा युवासेनेच्या वतीने निषेध करतो, असे योगेश धुरी यांनी टीका करताना म्हटले आहे.
तसेच ज्या कंत्राटदाराने हे टेंडर घेतले त्याने सिंधुदुर्गातील परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांचा जाण्यायेण्याचा खर्च द्यावा, खर्च देता येत नसेल तर परीक्षा केंद्र सिंधुदुर्गमध्ये करावे, यासंदर्भात स्वातंत्र्यदिनी जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन निवेदन देऊन संबंधित कंत्राटदारावर कारवाई व्हावी यासाठी युवासेनेच्या वतीने उपरोधिक आंदोलन करण्याचा इशारा धुरी यांनी दिला आहे.

You cannot copy content of this page